उत्पल व. बा. - लेख सूची

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)

आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील …

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग २)

‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे. समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा …

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग ३)

मागील दोन लेखांमध्ये बुद्धिप्रामाण्य, नास्तिक्य, विवेक, वास्तवाचं आव्हान या संदर्भाने आपण काही बोललो. या लेखात आपण विवेकवादाची मूळ मांडणी, विवेक-अविवेक हा निर्णय करण्याच्या कसोट्या याबाबत बोलूया. तत्पूर्वी एक नोंद – माणसाविषयी बोलताना सहसा ‘तो’ हे पुल्लिंगी संबोधन वापरलं जातं. वास्तविक ‘माणूस’ म्हणजे स्त्री, पुरुष यांच्यासह आज अस्तित्वात असलेले अनेक इतर लिंगभेद आणि लिंगभावदेखील. सवयीचा, सोयीचा …

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा – अर्ध्या वाटेवरचे विचार

अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई ‘घडते’ आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी – दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक …

राष्ट्रवादाच्या तीरावर

राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आणि त्यांच्या प्रासंगिकतेचा एका संवेदनशील मनाच्या लेखकाने आपल्या स्वतःच्या बुद्धी, अनुभव आणि आकलनाच्या कक्षेत घेतलेला शोध. ——————————————————————————– हा एक जुना प्रसंग आहे. २००५-०६ मधला. मध्य प्रदेशात बडवानीमध्ये ’नर्मदा बचाओ आंदोलना’चं ऑफिस आहे. मी मेधाताईंना प्रथम पाहिलं ते या छोट्याशा ऑफिसमध्ये. माझ्या या पहिल्या भेटीच्या वेळी पुण्यातून माझ्याबरोबर असीम सरोदे आणि शिल्पा …

अनुभव- लाल सवाल

नक्षलवाद, विकास, हिंसा-अहिंसा —————————————————————————- छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव. —————————————————————————- हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे …

असलेपण – नसलेपण

रा. स्व. संघ, डावा विचार, गांधी ——————————————————————————– अलिकडे डावे-उजवे ह्यांच्यातील वैचारिक संघर्ष हातघाईवर आला आहे. अशा वेळी स्वतःला ‘डावा’ समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याने स्वतःशी व विरोधी विचारांशी संवाद करून आपली जडणघडण तसेच भारतीय समाजाची मानसिकता ह्यांचा शोध घेण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न–– ——————————————————————————– मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद …

चित्रपट-परीक्षण/ ॲज अग्ली ॲज इट गेट्स

अग्ली, अनुराग कश्यप ————————————————————————— अनुराग कश्यप ह्या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या ‘निओ-न्वार’ शैलीतील नव्या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’चे सौंदर्य उलगडून दाखविणारा नव्या पिढीतील एका सिनेरसिकाचा दृष्टीकोन ————————————————————————— माणूस जितका क्लिष्ट त्याहून महानगरातील माणूस थोडा अधिक क्लिष्ट. जगणं पैशाशी बांधलेलं आणि पैशानेच सुटणारं. वाट, आडवाट, पळवाट यांतला फरक इथे धूसर होत जातो आणि नाहीसाही होऊ शकतो. ‘अग्ली’या खरोखरीच ‘अग्ली’[चित्रपटाची कथा …

सत्य

सत्याचे आह्वान, बुद्धीचे विधान सत्याचे स्वरूप, दमणूक. सत्य काडीमोड, सत्यप्रतिशोध सत्य तो आनंद, परावलंबी. सत्य प्राणिमात्र, सत्य सर्व गात्र गात्रांचे नवल, सत्यशोध. आभास सत्य, विश्वास सत्य, अश्रद्ध सत्य, ऐहिकाचे. सत्य पंचतत्त्व, सत्य गुणसूत्र सत्य अणुस्फोट, पृथ्वीवरी. सत्य गरजवंत, सत्य प्रज्ञावंत सत्य अदलाबदल, दोघांचीही. सत्य जीवशास्त्र, सत्य गर्भज्ञान सत्य संगतीच्या, निर्जीवाचे. सत्य आसवांत, सत्य विचारात सत्याची …